अवसरी : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे . या उपक्रमा अंतर्गत तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र यांच्या द्वारे वीविध कार्यक्रमांचे राज्यस्तरावर आयोजन करण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालय विभाग पुणे अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता प्रादेशिक स्तरावरील प्रकल्प स्पर्धा दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील अणुविद्युत विभागामधील संकेत मेंडके, श्रद्धा लोंढे, पूजा शिंदे व निखिल सोळंकी या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व तसेच सोशल डिस्टन्ससिंगची गरज लक्षात घेता त्यांनी “मल्टी फंक्शनल ब्लूटूथ ऑपरेटेड सर्वंट रोबोट” डिझाईन, फॅब्रिकेट, व प्रोग्राम करून स्पर्धेमध्ये उतरविला होता. सदर रोबोट हा कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन पातळी , तपमान व औषधे पुरवण्याचे काम करतो. सदर रोबोट मध्ये आयओटी व ब्लूटूथ कार्यरत असून अनेक सेन्सर चा यात वापर करण्यात आला आहे.
सदरील विद्यार्थ्यांनी नामांकित संघांना हरून स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. अथक परिश्रम व कोरोना सारख्या महामारीस रोखण्यासाठी या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी पद्धत कशी वापरता येईल हे त्यांनी दाखवले. विद्यार्थ्यांना डॉ. एन. पी फुटाणे यांचे मार्गदर्शन लाभले .सदर प्रसंगी प्र.प्राचार्य डॉ.एन.एस.नेहे अणुविद्युत विभाग प्रमुख डॉ. मनोज नागमोडे व श्री.जी.आर.फुले उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दि. रा. पानगव्हाणे यांनी या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: